पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त, 26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती..
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून सहा रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा २६ सप्टबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीत होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाल परब पुढे म्हणाले की सावंतवाडी मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आम्ही रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद संघातील जनतेसाठी अपघात व उपचार यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे, असे श्री. परब यांनी यावेळी
रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस
क सप्ताह म्हणून साजरा करणार असून यात
विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहोत. याची
सुरुवात उद्यापासून आम्ही करणार आहोत. या वाढदिवसाची समाप्ती १ ऑक्टोबर रोजी दोडामार्ग येथे होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अक्रम खान, विनोद राऊळ, अनिल निरवडेकर, मनोज नाईक, सुधिर आडीवरेकर, राजू बेग, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.