जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा

कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्रः मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा
रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्य आशयाचे निवेदन आज समितीच्या वतीने कुडाळ
तहसीलदार वीरसिंग वसावे याना देण्यात आले. या मागणीचा विचार झाला नाहीतर आंदोलनात्मक पवित्रा
घेण्यात येईल असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी
कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांचे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्टेशन व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मध्यवर्ती असे ठिकाण आहे. तसेच अनेक खाजगी हॉस्पिटल कुडाळ येथे आहेत. इमर्जन्सी वेळेला खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर सुविधा देऊ शकतात. यामुळे जिल्ह्यातील रुग्णाना कुडाळ शहरात जिल्हा रुग्णालय झाले तर फायदा होऊ शकतो
कुडाळ ग्रामीण रुग्णालय इमारत जीर्ण झाली आहे. हि इमारत निर्लेखित होऊ शकते. कुडाळ ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी कार्यान्वित आहे. ही इमारत निर्लेखित करून प्रशस्त जिल्हा रुग्णालयाची इमारत होऊ शकते. तसेच जुना सीईओ बंगला व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची वसाहत ही जागा आरोग्य विभागाची आहे. येथे जिल्हा रुग्णालय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वसाहत होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा रुग्णालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्रशस्त इमारत होऊन कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून शासनाकडे पाठवावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली येऊ.

या निवेदनाचा विचार झाला नाही तर, ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे लाक्षणिक उपोषण व सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. या निवेदनाचा विचार न झाल्यास कुडाळ बंद व अन्य आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल. असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अभय शिरसाट, काका कुडाळकर, प्रसाद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, श्रीराम शिरसाट, तरबेज शेख, उमेश शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, श्री. राणे, तौसिफ शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page