पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतर्गत आवाहन…
ओरोस प्रतिनिधी
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित केलेल्या जिल्ह्यातील १९८ गावांना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व नियम १९८६ मधील तरतूदींनुसार त्यांचे आक्षेप ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांचेकडील esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर नोंदवावेत असे आवाहन या विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित करण्यासाठी क्रं. SO३०६० (इ) ३१ जुलै २०२४ अन्वये मसूदा अधिसूचना जारी केलेली आहे. हि अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मसूदा अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्हे व ५६ तालुके अंतर्गत २५१५ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या ५ तालुक्यातील १९८ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास ज्या स्थानिक रहिवासींना त्याचा परिणाम होणार आहे, त्यांनी पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ व नियम १९८६ मधील तरतूदींनुसार त्यांचे आक्षेप ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांचेकडील esz-mef@nic.in या
ईमेल यागतीवर याश्रेया नोंदविणे यावश्यक