कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक.29/09/2024 रोजी दुपारी 3 वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड,कुडाळ या ठिकाणी महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी जिल्हा भंडारी महासंघाच्या नवीन कार्यकारणी साठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया करण्यात आली.पुढील महिन्याच्या13.10.2024.रोजी नवीन जिल्हा भंडारी महासंघाच्या नवीन कार्यकारी मंडळ निवड करण्यात येणार आहे.
यावेळी अध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव विकास वैद्य ,जयप्रकाश चमणकर ,भरत आवळे ,प्रमोद मोबारकर ,चंद्रकांत कोचरेकर ,सुनील नाईक ,अनंत कांबळी ,गिरीधर कोळकर ,समील जळवी ,दीपक कोचरेकर ,आत्माराम बंगे , विठ्ठल साळगावकर ,अजित गवंडे ,राजेंद्र आंबेरकर ,रवींद्र ताळशीलकर ,प्रदीप वेंगुर्लेकर ,दिवाकर मावळनकर ,शरद पावसकर ,शेखर गवंडे ,विलास करंजेकर ,लक्ष्मीकांत मुंडीये ,प्रसाद अरविंदेकर ,सिद्धार्थ पराडकर ,नामदेव साटेलकर ,दिलीप पेडणेकर ,वासुदेव (मामा) माडये ,एकनाथ टेमकर ,मोहन गवंडे ,वोठोबा पालयेकर ,विलास असोलकर ,उदय मयेकर ,प्रियदर्शन कुडव ,मनोहर पालयेकर अन्य समाज बांधव कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.
13.09.2024 या वार्षिक ईतिवृत्ताचे वाचन करण्यात आले.सन 2023 सन 2024 या वार्षिक जमा खर्च वाचून मंजूर करण्यात आले.तसेच सन 2024/2025 या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली.सन 2023 व सन 2024 या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले.आणि त्या नंतर पुढील तीन वर्षासाठी भंडारी नवीन कार्यकारणी साठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया करण्यात आली.