मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे

मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा.
माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे

सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायत च्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला होता. वेत्ये ग्रामपंचायतीने दिलेला प्रस्ताव प्रशासन, मंत्री दिपक केसरकर यांनी स्विकारला पाहिजे असे आवाहन वेत्ये ग्रामपंचायत माजी सरपंच व ठाकरे शिवसेना विभागप्रमुख सुनील गावडे यांनी केले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जमिनी अभावी रेंगाळत होते. तेव्हा वेत्ये ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी वेत्ये येथील ग्रामपंचायतीच्या जमीनीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी जागेवर येऊन पहाणीही केली होती. मात्र केसरकर यांनी सावंतवाडीचा हट्ट कायम ठेवला. आज केसरकर यांनी सावंतवाडीचा जमीन प्रश्नावरून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निर्णायक भूमिकेवर निर्णय घेतला पाहिजे असे श्री गावडे यांनी सांगितले.
वेत्ये ग्रामपंचायत येथे जमिनीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय मंत्री दिपक केसरकर यांनी जाहीर केला तर जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मुंबई गोवा महामार्गाच्या जवळपास ही जमीन आहे त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांना फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page