मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना

सातरल- कासरल भाजपचे भव्य आयोजन

कणकवली प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना आयोजन करण्यात आलेले आहे. हा महिला डबलबारी सामना प्रसिद्ध बुवा सौ. ऋतुजा पाळेकर – सावंत आणि बुवा सौ. साक्षी मुळम या दोघात रंगणार आहे.यादरम्यान दुपारच्या सत्रात दोन्ही गावातील महिला गटांच्या फुगडी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत.हे सर्व कार्यक्रम पुर्ण-प्राथमिक शाळा सातरल-कासरल येथे होणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला महिला भजनी बुवांच्या सुस्वर भजनांचा आनंद घेता यावा. भक्ती मय वातावरणात नवरात्र उत्सवाचा जागर व्हावा . या साठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सातरल-कासरल भाजप च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page