केसरकरांनी निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा सपाटा लावला
सावंतवाडी प्रतिनिधी
मी आतापर्यंत अनेक केसेस घेतल्या अनेक वेळा जेलमध्ये गेलो पण लोकांच्या प्रश्नासाठी परंतु केसरकर यांनी जो माझ्या आरोप केला आहे. त्या केस मध्ये माझा गाडीचाही संबंध नाही जर असल्यास त्यांनी सिद्ध करावे, ते ज्या साईबाबांचे नाव घेत आहेत तिथे त्यांनी हात लावून सांगावे, अन्यथा मी सांगतो असे थेट आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी केसरकर यांना आज येथे दिला. दरम्यान काही झाले तरी पक्षाने सांगितले तरी केसरकर यांचे काम करणार नाही तुम्ही काय करावे हा तुमचा निर्णय आहे. परंतु पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढवणारच, अन्यथा काय करायचं ते आपण सर्वांनी ठरवू असंही राजन तेली यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सावंतवाडी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
श्री तेली पुढे म्हणाले आज गेले पंधरा वर्षे आमदार व आठ वर्षे मंत्री व कॅबिनेट मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी खोट्या आश्वासन देण्यापलीकडे कोणत्याही काम केलेलं नाही. जनतेची केवळ फसवणूक केली. आता निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करण्याचा सपाटा लावल्या आहेत
ते युतीचे मंत्री आहेत त्यामुळे या कामावर भारतीय जनता पार्टीचा तेवढाच अधिकार आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे देखील ते नारळ फोडत आहे. त्यामुळे जर ते युती म्हणून विश्वासात घेत नसतील तर आम्ही तरी युतीधर्म का पाळावा..? असं सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आता मला धमक्या देण्याचे काम सुरू आहे. पण मी कोणाला घाबरत नाही मी संघर्षातूनच मोठा झालो तरीही आज जमिनीवर आहे. त्यामुळे उगाच माझ्या नादी लागू नका माला बोलणायाचा वरिष्ठांना नक्कीच अधिकार आहे. मात्र तुम्ही कोणीही उठून बोलले तर मी सहन करणार नाही माझ्याकडे अनेक पुराव्यात आहे. वेळ पडल्यास गांधी चौकात सभा घेऊन व्हिडिओ दाखवायला मागेपुढे पाहणार
नाही असं थेट आव्हान देखील श्री तेली यांनी यावेळी दिले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, एकनाथ नाडकर्णी, रविंद्र मडगावकर, आनंद नेवगी, रूपाली शिरसाट, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.