श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी सांगली येथे भेट घेऊन केली साविस्तर चर्चा.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
नोंदीत बांधकाम कामगार यांच्या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र चे कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब यांची सांगली येथे भेट घेऊन दिवाळीत कामगार वर्गाला दिवाळी बोनस जाहीर करावा तसेच शिष्यवृत्तीचे क्लेम अजून पेंडीग आहेत ते लवकरात लवकर मंजूर करून कामगार वर्गाच्या खात्यात रक्कम जमा करावी तसेच कामगार यांच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती प्रमुख प्रसाद गावडे व कृती समिती संघटनाच्या माध्यमातुन श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी संयुक्त कृती समिती मार्फत मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कायमस्वरूपी कामगार अधिकारी देण्यात यावा तसेच नैसर्गिक मृत्यू क्लेम चे वयोगट बदलण्यात यावा अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी कामगार मंत्री सन्मा श्री. खाडे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगार वर्गाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी सदैव तत्पर आहे असे आश्वासन देण्यात आले.
