भंडारी समाजाचे माजी युवा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी समाज भवनासाठी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री मा.ना.दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल आभार ..
मनसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांना अभिमान नसल्याचे ते स्वतः करतात मान्य…
शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांचे किनळेकर यांना खरमरीत उत्तर….
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी समाज भवनासाठी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री मा.ना.दिपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले.मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी माहिती अधिकार टाकून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे,अधिकाऱ्यांच्या नावाने गौण खनिज धारकांकडून पैसे उखळणे हे धंदे कुणाल किनळेकर यांचे आहेत.कुणाल किनळेकर हे स्वतः वाळू माफिया आहेत, हे सर्वांना न्यात आहे.झाराप येथील चिऱ्यांच्या तुटफुटला सिमेंट साठी वापरण्यात येणारी भुकटी आहे अशी अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारे कुणाल किनळेकर स्वत:च्या नेरूर विभागात जनतेसाठी केलेली कामे असतील किंवा माहिती अधिकार व्यतिरिक्त अन्य समाजपयोगी कामे केल्याचे जाहीर करावे.किंवा नेरूर विभागाची एखादी बैठक आयोजित करावी जेणेकरून त्यांचा लोकसंपर्क किती आहे त्यांचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना समजेल भंडारी समाजासाठी आपण कोणते योगदान दिले आहे का ते जाहीर करावे.अन्यथा अशी पक्षाची बदनामी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा घ्यावा.
