संजू परब:माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे
सावंतवाडी प्रतिनिधी
राजन तेली यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही. राणेंना हा धक्का नसून त्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केला.
ते म्हणाले, राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे यापुढे राणेंवर पुन्हा बोललात तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा श्री परब यांनी यावेळी दिला. प्रवेश करताना राजन तेली यांच्यासह एकही भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ते गेला नाही. यावरून त्यांनी विधानसभा प्रमुख म्हणून काय काम केले ते समजले असेल. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत गेलाय की नाही याची कल्पना नाही. त्याबाबत माहिती घेऊन सांगेन. माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी माझी भुमिका मांडेन असे मत संजू परब यांनी व्यक्त केले