कणकवली प्रतिनिधी
कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड करण्यात आली.
ही निवड माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या नियुक्तीसाठी योगेश जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.