कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी भरला उमेदवारी अर्ज
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ-मालवण मतदारसंघातून आज ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला. आमदार वैभव नाईक यांनी प्निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. तसेच यावेळी कुडाळ शहरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, मी मागील १० वर्षात जी कामे केलीत ती लोकांना माहीत आहेत. या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजयी होईन. माझ्या पाठीशी येथील जनता आहे. तर काल माझ्या विरोधात मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री बोलून गेलेत. पण या जिल्ह्यासाठी त्यांनी काय केले हे त्यांनी सांगितले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेत भ्रष्टाचारी कोण होते? हे त्यांनी सांगितले नाही, अशी टीका वैभव नाईक यांनी आपल्या 4विरोधकांवर केली.
