जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार..
सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपचे युवा नेते विशाल परब हे सावंतवाडी विधानसभेत अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. उद्या ते जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे आता सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढाई होणार आहे. याबाबत आपण आत्ता काही बोलत नाही मात्र उद्या बोलू, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून दीपक केसरकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आले आहे. त्या ठिकाणी इच्छुक असलेले माजी नगराध्यक्ष संजू परब यांना निलेश राणे यांच्यासोबत शिंदे शिवसेनेत प्रवेश करून केसरकर यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी आमदार राजन तेरी यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून उमेदवारीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांमध्ये विशाल परब नेमके काय करणार? निवडणूक रिंगणात उभे राहणार की नाही? अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. विचारपूर्वक उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मला मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यामुळे तूर्तास काही बोलत नाही. असे सांगून त्यांनी उद्या अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
