सावंतवाडी (प्रतिनिधी)
महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन तेली व कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.