सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा छाननी प्रक्रियेत अर्ज वैद्य ठरल्यानंतर त्यांनी आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. श्री देव पाटेकर उपरेलकर त्यांच्या दर्शनाने त्यांनी आपला प्रचाराचा शुभारंभ केले आहे त्यामुळे आता विशाल परब हे निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार असून खरे चित्र स्पष्ट होणार आहे.