…समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो

निवडणूकीच्या धामधूमीतही विशाल परब वारकरी संप्रदायाच्या यात्रेत भावविलीन..!

सावंतवाडी प्रतिनिधी
विशाल परब हे युवा नेतृत्व काही पारंपारिक राजकारणातील नव्हे. उद्योगाची जन्मजात आवड.. त्यात रतन टाटासारख्या जगद्विख्यात उद्योजकाचा बालपणापासून प्रभाव… आपली संपत्ती शतप्रतिशत वाढवण्यापेक्षा हा उद्योजक एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च का करतो याचे उत्तर तो कृतीतून शोधत गेला. त्याच्या कामाची दखल घेत भाजपाने त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यातूनही जनतेसाठी काहीतरी निश्चित करता येईल हे पटल्याने त्याने भाजपाचे सेवाभावी काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी उभे केले. गेल्या काही वर्षात आपल्या कार्यातून सावंतवाडीच्या क्षितीजावर उगवलेला तारा हा मूलतः धार्मिक प्रवृत्तीचा! विठू माऊली आणि श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त! आपली चिंता स्वामींवर सोडावी आणि वाटचाल करावी या साध्या सरळ तत्व प्रणालीतून त्याच्या मनावर अगदी धकाधकीच्या राजकीय ताणाचाही परिणाम कधी दिसत नाही!

आजचाच हा प्रसंग! वेंगुर्ले येथील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात पहाटे श्री विठ्ठलाची दिंडीसह निघालेली पालखी.. आणि कसल्याही मोठेपणाचा अंतरंगी अविर्भाव न बाळगता आजही विठू माऊलीच्या दिंडीत, राम कृष्ण हरीच्या जय घोषात, देहभान विसरून तल्लीन होत ती खांद्यावरून मिरवण्याचा आनंद श्री विशाल परब या अपक्ष उमेदवाराने सहज स्वभावाने पुढे होत घेतला. ना निवडणूक प्रचाराचे भान ना कसला राजकीय ताण! विठ्ठल SSS विठ्ठलSSS विठ्ठल SSS ….

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page