कणकवली हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश..

आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा..

कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हरकुळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करत्या महिला प्रतिनिधींनी सांगितले.
उपस्थित आमदार नितेश राणे,यांच्या सोबत गोट्या सावंत, इम्रान शेख,राजू पेडणेकर, बुलंद पटेल, जाहीर खान आदि भाजप उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page