भाजपला कुडाळ-मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के..
राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश:धाकू जाधव
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते वारंगाची तुळसुली गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना धाकू जाधव म्हणाले की राणे साहेब स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. राणे हे घराणेशाही करत असून सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे येऊ देत नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत वारंगाची तुळसुली गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी धाकू जाधव,निलेश जाधव, सत्यवान जाधव,संतोष जाधव,रामा जाधव,संतोष जाधव,महेश जाधव, मयूर चव्हाण,अनिल चव्हाण,भिसाजी जाधव,दत्तू कदम,छाया जाधव पूजा कदम,प्रियंका जाधव,अशोक जाधव, रामा जाधव संतोष जाधव व शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,विभाग प्रमुख गुरु सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर,घावनळे विभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर,तुळसुली शाखाप्रमुख उदय तुळसुलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत,बाबा वारंग,आनंद वारंग,प्रमोद मेस्त्री, केरवडे उपशाखाप्रमुख संतोष परब, राकेश तुळसुलकर,विजय उमळकर संचित ठाकूर,सागर जाधव,सिद्धेश धुरी,अभी मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.