महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी पक्षप्रवेशांचा केला पोलखोल ; वैभव नाईकांनी खोटे पक्ष प्रवेश दाखवून चालवलेली जनतेची दिशाभूल थांबवावी
मालवण प्रतिनिधी
उबाठात वैभव नाईक खोटे पक्षप्रवेश दाखवल्याने काही पडणार नाही. पण वैभव नाईक यांनी आमदार म्हणून कुठल्या लेव्हलवर जाऊन काम केलं पाहिजे, कुठल्या दर्जाचा काम केलं पाहिजे ? गेल्या दहा वर्षात वैभव नाईक काम दाखवू शकले नाहीत. मी तुमच्यावर बोलणार नव्हतो आणि बोलणार देखील नाही. पण हे मी तुमच्यावर बोललेलं नाही पण हा जो खोटा प्रचार आणि खोटा प्रकार चालू आहे,तो जनतेसमोर ठेवणं गरजेचं होतं. उबाठा गटामध्ये जे प्रवेश होताहेत ते खोटे आहेत ,फसवे आहेत आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत. वैभव नाईकांची शेवटची धडपड केविलवाणी आहे. वैभव नाईकांकडून खोटे प्रवेश दाखवून जनतेची दिशाभूल थांबवावी असा टोला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी लगावला.
मालवण येथुन माध्यमांशी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
आ. वैभव नाईक ठाकरे गटातील पक्ष प्रवेशांच्या माध्यमातून आपण दाखवताय की, जे काही उरलं सुरलं तुमचं स्तर होतं ते पण त्यांनी स्वतःहूनच खाली आणलेला आहे. यापेक्षा लोकांना काय हवं आहे ? वैभव नाईक यांनी स्वत: मागच्या दहा वर्षात देऊ शकला नाही, आता आपण काय देऊ शकतो, याचा विचार करावा. मागच्या काही दिवसांपासून आमच्या म्हणजेच राणेंच्या नावाने राणे कुटुंब ,भाजप किंवा शिवसेना यांच्यातून उबाठामध्ये काही प्रवेश होतात, ते वैभव नाईक दाखवतात . खरंतर एक – दोन व्यक्ती ते कुठून तरी पकडताहेत आणि त्यांच्या गळ्यात पट्टे बांधताहेत आणि तो प्रवेश दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गोष्टी फक्त खुलासा करण्यासाठी आपल्यासमोर ठेवतो , जे जे प्रवेश वैभव नाईक यांनी दाखवले आहेत, ते कसे खोटे आहेत ? ते आपल्यासमोर फक्त ठेवायचा मी प्रयत्न करतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
कुडाळ तालुक्यातील जांभवडे 3 व्यक्तींचा 17ऑक्टोबरला प्रवेश खेचरे कुटुंबीय आणि हे कायमस्वरूपी उबाठा गटामध्ये सक्रिय राहिलेले कुटुंबीय हा प्रवेश झालेला आहे. जांभवडे मधील दुसरा पक्ष प्रवेश 1 व्यक्तीचा चिंतामणी मडव त्यांचा भाजप किंवा अनेक कुटुंबियाची काही संबंध नव्हता , ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्रिंबक मध्ये 1 घाडी कुटुंबातील व्यक्तीचा प्रवेश झाला आणि दाखवण्यात आलं की भाजप किंवा राणे कुटुंबीयांच्या जवळ असलेला तो व्यक्ती आहे. खरंतर तुम्ही त्यांचं फेसबुक अकाउंट बघितलात तर 2017 पासूनचे त्यांचे फोटो हे तर तुम्हाला वैभव नाईक यांच्या सोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमातील दिसतील, असा खोटारडा आमदाराला जनतेने घरी बसवले पाहिजे. असे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी म्हटले आहे.
त्यानंतर मालवण कुंभारमाठ माजी सरपंच वैशाली गावकर हा तर सर्वात मोठा हास्यास्पद प्रवेश दाखवण्यात आला, कारण त्या अनेक वर्ष उबाठा गटातच होत्या. त्यानंतर धनगर वाडीतला मोडक कुटुंबियातला 1 प्रवेश वैभव नाईक यांनी दाखवला त्या कुटुंबाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. राजकारणाशी काही संबंध नाही. तर भाजप आणि शिवसेना असा कोणताही संबंध नाही. वैभव नाईक यांना त्यानंतर अरविंद सावंत हे वर्दे ग्रामपंचायत मध्ये आम्ही त्यांना तिकीट नाकारली होती. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तर ग्रामपंचायत निवडणूक होऊन आता किती वर्ष झाली. त्याच्यानंतर अरविंद सावंत नावाचा वर्दे गावातला माणूस आमच्या संपर्कात नव्हता, कारण आम्ही त्यांच्या स्वभावामुळे त्यांना आम्ही तिकीट नाकारले म्हणून ते सक्रिय नव्हते. ते वैभव नाईक यांच्या सोबतच गेले होते. तेव्हाच त्यानंतर सदानंद अनावकर या व्यक्तींचा प्रवेश दाखवण्यात आला , खरंतर ही व्यक्ती 2013 पासून सक्रिय राजकारणात नाही आमची ओळख होती हे सगळं बरोबर आहे . पण 2013 पासून ही व्यक्ती काही त्यांच्या वैयक्तिक कारणावरून राजकारणातून बाजूला झाली. एवढी वर्ष कधी डायरेक्ट संपर्क राहिला नाही आणि अचानकपणे त्यांनी जर पक्ष प्रवेश केला असेल तर आमचा संबंध नाही. वैभव नाईकांचे पक्ष प्रवेश कोण राजकारणातच नाही , सक्रिय नाही अशा गावातला एखाद दुसस-या माणसाला शोधून जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
आम्ही प्रवेश करताना अख्या अख्या गावांचा प्रवेश करतो. 400 , 500 लोकं प्रवेशाला असतात. आणि ह्यांच्या प्रवेशाला इनमीन तीन- चार -पाच त्याच्या पलीकडे ह्यांच्याकडे पक्ष प्रवेशही होत नाही. वैभव नाईक मला माहिती आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे. पण तरी देखील मी निवडणुकीत स्तर खाली जाऊ देणार नाही, मी आपल्यावर टीका करणार नाही ,मी उलटा तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छा देतो आपण पूर्ण प्रयत्न करावेत. असा उपरोधक टोला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी लगावला.
