मंत्री केसरकर यांनी साधला माजी सैनिकांशी संवाद
सावंतवाडी प्रतिनिधी
मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे. ते ध्येय पुर्ण करण्यासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. श्री. केसरकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या सावंतवाडीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा संघटक संजू परब, अमित कामत, गुरूनाथ सावंत, हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, नंदू शिरोडकर, श्री. आईर, श्री. सावंत, श्री. गावडे यांसह सिंधुदुर्ग जिल्हा