पोलिस ठाण्यात संबंधिता विरोधात तक्रार…
सावंतवाडी प्रतिनिधी
सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब चांगल्याच आक्रमक झाल्या. सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी संबंधिताविरोधात तक्रार दाखल केली. महिला आयोगाचही त्यांनी लक्ष वेधलं. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सौ. घारेनी केली.