“कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ…
वेंगुर्ला प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला . भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी , अंदमान – निकोबार ते कच्छ अशी देशभर सदस्य नोंदणी केली जाणार आहे . भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे . या अभियानात पक्षाची सदस्य संख्या आणखी वाढवून विविध समाज घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे . या माध्यमातून पक्षाची विचारधारा , सैद्धांतिक भुमिका सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे . भाजपा कार्यकर्ता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगत असतात. पक्षाचे कार्यकर्ते हे देशाच्या , जनतेच्या सेवेसाठी आहेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका आहे .ही भुमिका सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी तसेच सामान्य नागरिकांचा विकसित भारताच्या उभारणीत सहभाग वाढावा , असा उद्देश सदस्यता अभियानामागे आहे असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .
यावेळी जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन भाजपा च्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान २५ सदस्य करावेत , असे आवाहन केले .
यावेळी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे ,ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , आय टी सेल जिल्हा संयोजक ऋषी( केशव ) नवाथे , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , वृंदा गवंडळकर , सारीका काळसेकर ,आरवली,शिरोडा, रेडी , शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे महादेव नाईक , मयूरेश शिरोडकर ,जगन्नाथ राणे ,आरवली सरपंच समीर कांबळी , रेडी उपसरपंच नमिता नागोळकर , आरवली ग्रामपंचायत सदस्य रिमा मेस्त्री , मा.सरपंच तातोबा कुडव , अणसूर सरपंच सत्यविजय गावडे , आसोली सरपंच बाळा जाधव , माजी सरपंच श्रध्दा जाधव , मोचेमाड ग्रामपंचायत सदस्य नारायण गावडे , शिरोडा बूथ अध्यक्ष अनुक्रमे संतोष अणसूरकर , सुरेश म्हाकले , स्वप्नील तोरस्कर , श्रीकृष्ण धानजी ,चंद्रशेखर गोडकर , प्रसाद परब ,शिरोडा भाजप पदाधिकारी अनिल गावडे ,विदयाधर धानजी ,बाळकृष्ण परब ,शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा महिला पदाधिकारी समृध्दी धानजी,गंधाली करमळकर , स्नेहा गोडकर , मनीषा भोपाळकर , पुष्पलता परब, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य हेतल गावडे , रेखा नाईक, वेंगुर्ला युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे ,रेडी भाजप महिला पदाधिकारी श्रध्दा धुरी , मोचेमाड बूथ अध्यक्ष उदय गावडे , किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सत्यवान पालव , आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर , आरवली भाजप पदाधिकारी रवींद्र कुडाळकर , विश्वनाथ उर्फ भाई शेलटे , गजानन नाईक , वासुदेव आरोलकर , चंद्रकांत कांबळी, ज्ञानेश्वर केरकर , आरवली महिला पदाधिकारी नंदिनी आरोलकर , आसोली शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, बुथ प्रमुख बाळू वस्त ,सागरतीर्थ ग्रा. सदस्य पाडुरंग फोडनाईक , उभादांडा बुथ प्रमुख दादा तांडेल , अनुसूचित जाती मोर्चाचे मधु माडकर व देवदत्त चव्हाण उपस्थित होते.
यावेळी गोवा राज्यातील म्हापसा येथील मा.नगराध्यक्षा शुभांगी वायगंणकर व मा. नगरसेवक गुरुदास वायगंणकर यांनी भेट देऊन अभियानाचे कौतुक केले .