लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट.
सिंधुदूर्गनगरी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, कोंडूरे,गुळदुवे,तळवणे,दांडेली,नाणोसआरोंदा या परिसरात गोव्यातील एक खाजगी कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाली करत आहेत या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांकडून जमिनी मिळण्यासाठी कंपनीचे एजंट लोक गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामुळे प्रकल्प जळगाव मध्ये होणार आहे त्या गावातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभांमध्ये गावात मायनिंग प्रकल्प नको असा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. यालाच अनुसरून आज मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे,तळवणे सरपंच समीर केरकर,उपसरपंच रंजा गावडे, गूळदुवे माजी सरपंच रूपेश धर्णे, गूळदुवे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र धर्णे यांनी आज ओरोस मुख्यालय सिंधूनगरी या ठिकाणी जावून प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सौ. सावंत,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन देऊन गावात मायनिंग प्रकल्प नको अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली.