वेंगुर्ला प्रतिनिधी
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले .इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे व परखडपणे आपल्या विषयांची मांडणी केली. प्रशालेच्या शिक्षिका सौ.प्रियांका गजानन मिसाळ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोजा यांच्या हस्ते स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी अलिझा शेख हिने तर आभार प्रदर्शन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी सोनम शेटकर हिने केले.संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख, संचालक श्री. प्रशांत नेरुरकर, सेक्रेटरी श्री.दत्तात्रय परूळेकर , मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.