सावंतवाडी ते उपवडे एसटी बस नियमित व वेळेवर सुरू करण्याबाबत दिले निवेदन.
सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी ते उपवडे एस टी बसच्या सेवेबाबत माणगाव ग्रामस्थ व प्रवासी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. याबाबत त्यांनी आकार प्रमुखांची भेट देत आपले निवेदन सादर केले. यात त्यांनी पुढील पंधरा दिवसात योग्य ती सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.
याबाबत प्रवासी व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की, आम्ही माणगावं गावचे रहिवाशी तसेच आपल्या महामंडळाचे प्रवासी आपणास विनंतीपूर्वक निवेदन देतो की, महोदय सावंतवाडी ते उपयवडे येथे संध्याकाळी ६ वाजुन ५० मिनीटांनी जी बस सुटते त्या बसची सेवा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. सदरच्या सेवेबाबत पुढील तकारी आहेत यांची नोंद घ्यावी व लवकरात लवकर निवारण करणे. अन्यथा पुढील १५ दिवसांत आपल्या कार्यालयाच्या व प्रशासनाच्या विरोधात कायदेशीर व सनदशिर मार्गाने तिव्र आंदोलन उभारणार यांची नोंद घेणे.
तकारी पुढील प्रमाणे-
१. सदरच्या बसचा वेळ यापुर्वी ६ वाजुन ३० मिनीटांनी होता. तो ६ वाजुन ५० मिनिटे पर्यत करण्यात आला. याबाबत लेखी खुलासा देणे.
२. सदरच्या बसची संध्याकाळी ६ वाजुन ५० मिनिटांनी आपला अधिकृत वेळ असताना सुध्दा आपण नेहमी सदरची बस नियोजित वेळेमध्ये का सोडत नाही?, या बाबत लेखी खुलासा करणे
३. सदरची बस ही नेहमी अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये ब्रेक डाऊन होते. याबाबत कोणती कारणे आहेत, याबाबत लेखी खुलासा देणे.
४. आपल्या वाहतुक नियंत्रण कक्षामधील व्यवस्थापक ग्रामस्थांशी तसेच प्रवाशांची उध्दट भाषेत व अर्वाच्च भाषेत बोलतात. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्याचा लेखी खुलासा देणे व तत्काळ कार्यवाही करणे. (19/12/2024 वेळ 736 वाजता चे वाह नियंत्रक अनिल गावडे)
५. सदरच्या सर्व विषयांवर आपण किती दिवसांच्या आत मार्ग काढणार याबाबत आपण लेखी आश्वासन देणे.
महोदय सदरची बस ही अत्यंत दुर्गम भागामध्ये प्रवास करते तसेच प्रवाशांना सुध्दा याबाबत उशीर होतो. सदरच्या बसमधुन अनेक महिला प्रवाशी प्रवास करतात त्यांना सुध्दा मानसिक व शारिरीक नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेवुन कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अन्यथा येत्या १५ दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत, अशी मागणी दीपक जयराम काणेकर, दिव्या गोपाळ तामाणेकर, उषा संतोष नार्वेकर, तन्वी कृष्णा भोई, सानिका दत्तदिगंबर धुरी, साची संदीप लाड, समृद्धी अरुण भगत, संजना कदम, प्राजक्ता विठोबा सावंत, गिरीश कडव, सौरभ रामचंद्र नानचे, शुभम मंगेश सुकी, महादेव प्रदीप सावंत, सिमरन सुशील कामत, भावना जाधव, निकिता गुरुनाथ चिले, युगा योगेश केसरकर, न्याटीसा डिसोझा, सावी सुशील कामत, संजय गोसावी, विधीशा चव्हाण, वैष्णवी कदम, दीपावली दीपक कदम, करुणा किशोर कदम, खेमा सावंत, अरविंद परब आदी ग्रामस्थांनी सदर निवेदन दिले आहे.