नगरसेवक उदय मांजरेकर:अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास विलास कुडाळकर यांनी राजीनामा द्यावा
कुडाळ प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ संकल्पना राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सुरुवात करण्याचे प्रयत्न चालू केले
कुडाळ विकासाला खो घालण्याची नेहमीच विरोधकांची भूमिका राहिलेली आहे नगरसेवक श्री विलास कुडाळकर म्हणत आहेत की गप्पी मासे पैदास प्रकल्पासाठी चार लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. पण दोन लाख रुपया पेक्षा जास्त रकमेची निविदा काढायची असेल तर असे विषय मासिक सभेमध्ये ठेवले जातात. सदर विषय मासिक सभेमध्ये ठेवण्यात आला नाही कारण सदर गप्पी मासे पैदास प्रकल्प व गप्पी मासे वाटपासाठी एकूण नगरपालिका फक्त 25 हजार रुपये खर्च करणार आहे व 25 हजार रुपये च्या वरती जर नगरपालिका खर्च करत असेल तर भाजप नगरसेवक विलास कुडाळकर यांनी सिद्ध करावे. तसेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गप्पी माशांच्या या प्रकल्पासाठी जर कोणती निविदा प्रक्रिया बाबत नगरपंचायतीने पावले उचलली असतील तर त्याबाबतची कागदपत्रे जनतेसमोर आणून त्यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा
गप्पी मासे हे फुकट दिले जातात हे नगरसेवक विलास कुडाळकर यांना माहीत होते तर त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवून निदान स्वतःचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये अशा गप्पी माशांचे वाटप का केले नाही? किंवा अशा प्रकल्पाबाबत सभेमध्ये माहिती देऊन असे प्रकल्प राबविण्याच्या सूचना का केल्या नाहीत. यावरून आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्याने विकास कामे करायला गेल्यावर राजकारण करण्यासाठी फक्त विरोध करायचा हे वृत्ती पहिल्यापासून दिसून येत आहे.
तसेच कुत्र्याच्या नसबंदीच्या आरोपा बाबत बोलायचे झाले तर कुत्र्याच्या नसबंदी संदर्भात मोहीम राबविण्यात आली होती. परंतु त्या संस्थेस अजूनही एक रुपयाचे बिल सुद्धा नगरपंचायतीच्या माध्यमातून अदा केले गेलेले नाही. त्यामुळे जर बिलच अदा केले गेले नाही तर विलास कुडाळकर कुत्रा नसबंदी संदर्भात घोटाळा केला गेला हे कोणत्या आधारावर आरोप करतात ते त्यांनी प्रथम सिद्ध करावे.
नगरपंचायतीच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजार गप्पी माशांची पैदास करणार आहे व ते मोफत स्वरूपात लोकांना देण्यात येणार आहे व त्यासाठी कोणताही ठेका काढलेला नाही व या संदर्भात सर्व मार्गदर्शन मुळदे कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून घेतले जात आहे जर चार लाखाचा ठेका नगरपालिकेच्या माध्यमातून काढला असे त्यांचा आरोप आहे तर त्यांनी ते तसेच सिद्ध करावे व तसेच सिद्ध न केल्यास स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा विलास कुडाळकर हे नेहमीच कोणत्याही विकास कामाला खो घालण्याचे काम करत असतात. बिन बुडाचे आरोप करतात .
त्यांनी केलेले एकही आरोप अजून पर्यंत सिद्ध करू शकले नाहीत. हे महत्त्वाचे
