कुडाळ बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा

कुडाळ प्रतिनिधी
बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै प्रशाळेमध्ये शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर स्पर्धेसाठी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पाठवावे, असे आवाहन मुख्याध्यापक पी. सी. राठोड व आयोजकांनी केली आहे.

स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे –

खुला गट –
विषय –
1. बॅरिस्टर नाथ पै एक आदर्श संसद पटू
2. बॅरिस्टर नाथ पै जीवन व सामाजिक कार्य
3. बॅरिस्टर नाथ पै – वक्ता दशहस्त्रेषु

वयोमर्यादा -17 ते 55 वर्षे

कालावधी – 8+1 मिनिटे

शालेय गट –

विषय – बॅरिस्टर नाथ पै बालपण व सामाजिक कार्य

वयोमर्यादा – इयत्ता 5वी ते 10 वी

कालावधी – 6+1 मिनिटे

बक्षीस –

प्रथम क्रमांक – रोख रक्कम रुपये २१००/, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह

द्वितीय क्रमांक- रोख रक्कम रुपये ११००/, प्रशस्तीपत्रक,मानचिन्ह

तृतीय क्रमांक – रोख रक्कम रुपये ५५१/, प्रशस्तीपत्रक व मानचिन्ह

उत्तेजनार्थ -२०१/ रुपये व प्रशस्तीपत्रक.

दिनांक – शनिवार 18 जानेवारी 2025 सदर स्पर्धा घेण्यात येईल.

स्थळ – बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळेश्वर मंदिर शेजारी, कुडाळ.

वेळ – सकाळी ठीक 9 वाजता स्पर्धा सुरु होईल.

संपर्क क्रमांक –
श्री. राठोड पी. सी.
9420334522
श्री. गावडे डी आर 9422090316
सौ. पावसकर एस. एस. 8275787826

(टीप – स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी भाषणाचा लिखित मजकूर सादर करावा.)

इ. 10 वी पूर्वपरीक्षा व 9 वी घटक चाचणी क्र 2 या नियोजित परीक्षामुळे वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 सकाळी 9 वाजता घेण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page