वेंगुर्ला प्रतिनिधी
रामघाट येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ११ व १२ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे.
यात ११ ला संध्याकाळी ५.४५ पासून बक्षिस वितरण समारंभ तसेच करमणूकीचे कार्यक्रम असणार आहेत. बक्षिस वितरण समारंभाला संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख व संचालक प्रशांत नेरूरकर उपस्थित राहणार आहेत. १२ ला संध्याकाळी ६. वाजल्यापासून पूर्ण वेळ करमणूकीचे कार्यक्रम असणार आहेत. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे दोन दिवस चालणारे कार्यक्रम म्हणजे ‘वेंगुर्ल्याचा मिनी पर्यटन महोत्सव कम फुडफेस्टीवल’ असतो. या ठिकाणी खवैय्यांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या भव्यदिव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांनी केले आहे.
