सिंधुदुर्ग दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वैद्यकीय तपासणी करून पोलीस दलास आरोग्यदायी व अधिक सक्षम बनवण्याचा निर्धार..
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
पोलिसदलातील कर्मचाऱ्यांची अनियमीत कामाची वेळ व सततचे बंदोबस्त यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे परीणाम तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियमीतपणे वैद्यकिय तपासणी होत नसल्याने पुढे जाऊन होणारे गंभीर आजार ,यातील काही आजार तर निव्वळ योग्यवेळी निदान न झाल्याने गंभीर स्वरुप धारण करतात. याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी घेत शासन निर्देशानुसार 40 वर्षावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला .या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन आज जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.या वैद्यकीय शिबीरामध्ये प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या 17 प्रकारच्या तपासण्या करुन आजारांचे निदान करुन त्यावरील आजारांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या पोलीस अधिकारी व अंमलदारास गंभीर आजार असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांना पोलीस कुंटुब आरोग्य योजने अंतर्गत तात्काळ उपचाराकरीता पाठविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पोलीसांना आरोग्यसेवा पुरविणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. तसेच यापुढे देखील पोलीस दलास आवश्यक ती मदत करण्याबाबत ग्वाही दिली. त्याचप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल यांनी वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व अंमलदार यांचेसह सिंधुदुर्ग दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांची ही वैद्यकीय तपासणी करुन पोलीस दलास आरोग्यदायी व अधिक सक्षम बनविण्याचा निर्धार असल्याचे सांगितले. त्यानंतर वैदयकिय तपासणी पुर्ण झालेल्या उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य कार्ड प्रदान करण्यात आले.
