संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या या वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध:उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तसेच काल सावंतवाडी तालुक्यातील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिथे भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही त्या ठिकाणी विकास निधी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते.आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून निपक्षपाती राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या घेतलेल्या शपथ विधिचा विसर पडलेला दिसतोय असे वाटतेय. मंत्री नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मान्य आहे का.दिपक केसरकर यांनी पक्षाचा प्रवक्ते म्हणून प्रत्येक वेळी भूमिका मांडणारे यावेळी गप्प का अशाप्रकारे जर सत्ताधारी म्हणून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी ना विकास निधी बाबत दुजा भाव कोणी दाखवत असेल तर त्याला यापूर्वी दाखविलेलेच आहे आता पुन्हा एकदा भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनताच योग्य उत्तर देईल.
