सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या “सोशल मिडीया लॅबच्या” इमारतीचे भूमीपूजन संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
इंटरनेट हे सध्या कोणत्याही प्रकारची माहिती सहज प्राप्त करण्याचे व दळणवळणाचे प्रमुख साधन बनले असून दिवसेंदिवस त्याचा अगणित वापर होताना दिसत आहे. इंटरनेटच्या व सोशल मिडियाच्या चांगल्या उपयोगाबरोबरच समाजविघातक प्रवृत्ती, गुन्हेगार यांचेकडून सामाजिक अशांतता, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, व्हीडिओ व ऑडिओ क्लिप प्रसारीत करणे, वैयक्तिक स्वार्थासाठी इतर व्यक्तींची बदनामी करणे, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य किंवा संदेश प्रसारीत करणे तसेच अन्य गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होत असल्याने हा विषय आवाहानात्मक व चिंतेचा विषय बनलेला आहे.

मा. केंद्रिय गृह मंत्रालयाच्या “Establishing Social Media Labs & Collection of intelligence from Social Media” या प्रोजेक्ट अंतर्गत समाज माध्यमांवर बारकाईने तपास यंत्रणांकडून पर्यवेक्षण करणे] संशयीत व आक्षेपार्ह पोस्टवर तात्काळ कायदेशीर कारवाई करुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्यास योग्य प्रतिबंध करणे. असे गैरकृत्य किंवा गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना वेळीच आळा बसविणे यासाठी भविष्यातील समाज माध्यमांच्या गैरवापराचा विचार करता सोशल मिडिया लॅब कार्यान्वीत असण्याची गरज ओळखून मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी जिल्हा नियोजन समिती (DPDC) यांचेकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

सदर प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानतर आज दि. 05/03/2025 रोजी मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानाच्या वरील बाजूस सोशल मिडिया लॅबच्या इमारतीचा भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. अक्षय पवार, श्रीमती केणी तसेच ठेकेदार श्री. केळकर, पत्रकार, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page