भजन परंपरा जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील युवक कायमच पुढे असतात:शिवसेनेचे अतुल बंगे!

कुडाळ प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवक कायमच भजन परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन भजन स्पर्धा आयोजित करतात ही अध्यात्माकडची यशस्वी वाटचाल आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले
स्वरसंगित भजन मंडळ हरीचरणगिरी कोंडुरा आयोजित विठ्ठल पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले पं पु दादा पंडित यांच्या दत्त स्थान म्हणजे पवित्र स्थान असुन इथे नामस्मरण आणि भक्ती यावर भर दिला जातो अशा या पवित्र स्थानामध्ये येथील युवकांच्या पुढाकाराने भजन स्पर्धा आयोजित करुन पुढील पिढीला आदर्श घालून दिला आहे असे सांगून बंगे म्हणाले आपण या भागात सामाजिक क्षेत्रात सरपंच अवि दुतोंडकर यांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असुन भविष्यात या भागातिल प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला आपला सहभाग कायमच असेल असेही श्री बंगे यांनी सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेना वेंगुर्ला तालूका प्रमुख नितीन मांजरेकर यांनीही आपले विचार मांडले
व्यासपीठावर सरपंच श्री अवि दुतोंडकर, उपसरपंच श्री धोंड, हभ प अवधुत नाईक परीक्षक आनंद मोर्ये, परीक्षक योगेश प्रभु पोलीस पाटील सौ साक्षी धुरी, आंदुर्ले सरपंच श्री अक्षय तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य महेश मुननकर व ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंदुर्ले ग्रामपंचायत सदस्य श्री भगत यांनी केले व आभार प्रदर्शन सरपंच श्री अवि दुतोंडकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page