आकाशातून घरावर पडला तब्बल ५० कीलो वजन असलेला तुकडा

नागपूर प्रतिनिधी
उमरेड तालुक्यात पहाटेच्या सुमारास साधारणपणे ५० किलो वजन असलेला धातूचा तुकडा आकाशातून घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसे ले-आऊट भागातील स्थानिक नागरिक अमय बसवेश्वर यांच्या घरावर हा धातूचा भला मोठा तुकडा पडला. ज्यामुळे छतावरील सुरक्षा भिंतीचा थोडा भाग तुटला आहे. पहाटे हा प्रकार घडल्याने सर्व लोक खडबडून जागे झाले आणि घाबरून घराबाहेर पडले.

या घटनेबाबत उमरेड पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर धातूचा तुकडा कशाचा आहे, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून, हा तुकडा पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे. हा धातूचा तुकडा ५० किलो वजनाचा आहे, अंदाजे १० ते १२ एमएम जाडीचा आणि ४ फूट लांब आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page