कुडाळ प्रतिनिधी
आकेरी कशेलवाडी रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती माजी उपसभापती व कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला
येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी उपाध्यक्ष संदीप राणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती.राणे यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला त्या मागणीचा विचार करून जिल्हा नियोजन समिती सदस्य सावळाराम आनावकर यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन योजना सन 2024- 25 मधून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने डांबरीकरीकरणा चे काम पूर्ण झाले
यावेळी प्रकाश राणे,अशोक राणे, तालुका कार्यकारणी सदस्य प्रेमनाथ बांदेकर,उमेश पेंडुरकर,सचिव संतोष सावंत,आत्माराम कोरगावकर,विजय कुडव,भिकाजी सावंत, प्रसाद राऊळ श्रावण सावंत,विजय कुळव,राजन धुरी ,शैलजा राणे,रेश्मा राणे,नाना शिरवलकर उपस्थित होते.
आकेरी कशेलवाडी रस्त्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
