समता परिषदेच्या समन्वयक पदी काका कुडाळकर यांची निवड
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात ओबीसी मुलांसाठी वसतिगृह होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असा दावा समता परिषदेचे नवनिर्वाचित समन्वय काका कुडाळकर यांनी आज येथे दिला. श्री. कुडाळकर यांच्याकडे अखिल भारतीय समता परिषदेचे समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. आज याबाबत पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेश लाड व सर्फराज नाईक उपस्थित होते.
यावेळी श्री. कुडाळकर म्हणाले, ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र ओबीसींची चळवळ सुरू आहे. ही समता परिषद राजकीय पक्ष विरहित असून यामध्ये ओबीसी व अन्य आरक्षित समाजाचे हित राखायचे आहे, असा कार्यकर्ता यात सहभाग घेऊ शकतो. ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक गोष्टींमध्ये या जिल्ह्यात ओबीसी समाज दबलेला गेला आहे. या दबलेल्या समाजाचा आवाज बुलंद करण्याचा काम या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. यापूर्वी समता परिषदेच्या माध्यमातून फारसे काम या दोन जिल्ह्यात उभे राहिलेले नाहीये. त्यामुळे ते एक आव्हान आहे. परंतु प्रत्येक तालुक्यात ओबीसींना आधार देण्याचे काम समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचे आहे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे ओबीसी विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत,
