मनसे पदाधिकाऱ्यांची प्रांताकडे मागणी…
कुडाळ प्रतिनिधी
अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच कारवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध वाळु उत्खननातून पैशाने गब्बर झाले असल्याचे दिसुन येते.
पावसाळ्यात रस्ते खराब होत आहेत. या कारणाने पावसाळ्यात तरी निदान अवैध वाळु वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्था कडुन विनंती केली तरी .
पैशाच्या जोरावर, प्रशासन आपल काहि करु शकत नाही.अशा अविर्भावात पावसाळ्यात देखील वाहतूक,उत्खनन बंद ठेवण्यास तयार नाहीत.
कायद्याचा धाक नसल्याने हा उन्मत्त पणा वाढला असून.
यावर लगाम घालण्या करीता.नवीन कायदयाची कडक अंबलबजावणी करण्यात यावी.
जेणे करुन यावर आळा घालता येईल.
असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसे उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे यांच्या नेतृत्वाखालील आज प्रांत यांची भेट घेण्यात आली यावेळेस
मनविसे तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर , सुशांत परब, विष्णू मस्के ,जितू नेवगी उपस्थित होते.
