कुडाळ (प्रतिनिधी)
जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय वाडोस येथे वृक्षाला राखी बांधून आगळावेगळा रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या बांधून रक्षाबंधन साजर करण्यात आलं. सोबतच परिसरातील वृक्षांना राखी बांधत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत वृक्षाबंधन केलं.
शाळेतील कला शिक्षक डॉ. आनंद राटये यांनी मुलांकडून राखी बनवून घेतली. राखी मुलांतर्फे प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत सराफदार यांच्याकडून झाडाला बांधन्यात आली. तसेच शिक्षिका सौ. श्रेया पवार, सौ. दिक्षा म्हाडगूत, सौ. आराध्या भिसे, सौ. हिमानी सावंत शिक्षक श्री विठोबा कडव सर आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री विजय चव्हाण यांच्या प्रयत्नांनातून हा उपक्रम यशस्वी पार पडला.
