सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील कारिवडे डंगवाडी येथील परशुराम प्रकाश पोकरे (वय 32) याचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे पोखरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सावंतवाडीचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पोखरे कुटुंबयांचे सांत्वन करीत धीर दिला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेंकर ,माजगावचे माजी सरपंच दिनेश सावंत, चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, अमय पै, आदी उपस्थित होते
