सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे स्वागत स्वीकारले. या वेळी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याची आणि स्थानिक प्रश्नांची चर्चा झाली. मंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, दिलीप भालेकर, प्रसाद आरविंदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर आणि मिसबा शेख यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट..
