“अखेर” भाजप पक्षप्रवेश निश्चित,शक्तीप्रदर्शनास विशाल स्वगृही परतणार..
*🎤सिंधुदुर्ग (मिलिंद धुरी)*
गेले महिनाभर विशाल परब भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा होती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर परब यांचा भाजप प्रवेश होईल असे जिल्ह्यात चर्चा होती
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून असंख्य युवा कार्यकर्ते घेवून विशाल परत मुंबई दाखल झाले आहे.विधानसभा अपक्ष लढवली त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांची फळी उभारत 35 हजार एवढी लक्षणीय मते घेतली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त होते त्यामुळे त्यांच्या राजकारण पुन्हा सक्रिय होण्याची प्रतीक्षा होती. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल.राजकीय पक्षप्रवेशाबद्दल उत्सुकता आहे.
