सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
दिल्ली प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या, असा स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही.
यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला. तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ३१ जानेवारी २०२६ नंतर तारीख वाढवून
देणार नाही स्पष्ट केले.
