जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ कायदा २०१३ कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधीजिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ २०१३ (Posh Act) मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशा अन्वये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ २०१३ (Posh Act) दिनांक १८.०९.२०२५ रोजी जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे साजरा करणेत आले. सदर कार्यक्रमास मा. श्रीमती विद्या देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग, मा. श्री. रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, मा. श्रीमती सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग, मा. श्री. मनोज पाटणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, अॅड. रुचा लोखंडे, सहाय्यक लोकअभिरक्षक सिंधुदुर्ग, अॅड. श्वेता तेंडूलकर, सहाय्यक लोकअभिरक्षक सिंधुदुर्ग, तसेच जिल्हा परिषद कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

मा. श्रीमती विद्या देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरण बाबत मार्गदर्शन करताना स्त्री ने स्वतःला अबला समजू नये, स्त्री ही एक शक्ती आहे. स्त्री-पुरूष समान आहेत, कार्यालयामध्ये, समाजामध्ये दोन्ही वर्गानी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे असे सांगितले.
4G+

मा. श्री. रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.

सिंधुदुर्ग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की अजूनही आपल्यामध्ये महिलांना समान समजले जात नाही. मुलगा-मुलगी यामध्ये भेदभाव केला जातो. तसेच आपण कार्यालयामध्ये, समाजामध्ये वागताना आपली भूमिका ही चांगलीच असली पाहिजे, “कारण हा जन्म पुन्हा नाही.”

अॅड. रुचा लोखंडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायदा २०१३ (POSH Act) याबाबत माहिती दिली. तसेच हा कायदा का अस्तित्वात आला? या समितीवर किती सदस्य असावेत. समिती कशाप्रकारे काम करते या बाबत सखोल माहिती दिली. लैगिक छळ कोणकोणता असू शकतो. उदा. अश्लिल चित्र दाखवणे, शारिरीक सुखाची मागणी करणे. लैंगिक दृष्ट्या ठळक टिपणी करणे. जवळीक साधणे याबाबत उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. छळ झाल्यास ३ महिन्याच्या आत तक्रार दाखल करावी. समिती सर्व माहिती गोपनीय ठेवते याबाबत माहिती दिली. अॅड. श्वेता तेंडूलकर, सहाय्यक लोकअभिरक्षक सिंधुदुर्ग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page