सावंतवाडी प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ परिवारातर्फे आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या विशेष सहकार्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
सच्चिदानंद (संजू) परब – माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी तथा शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट),
विक्रांत सावंत – अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी,
श्रीधर पाटील – तहसीलदार, सावंतवाडी, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे – वैद्यकीय अधीक्षक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार बांधवांच्या कुटुंबियांना शैक्षणिक सहाय्य मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असून, कार्यक्रमानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग परिवाराची’ छोटी मीटिंगही होणार आहे.
आयोजकांनी सर्व पत्रकार बांधवांना या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
