दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील सोन्या व चांदिचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 13,92,000/-(तेरा लाख व्याण्णव हजार रुपये) एवढ्या रक्कमेचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत दिले फिर्यादीवरुन कणकवली पोलीस ठाणेत दि. 04.11.2025 रोजी 22.46 वाजता गुन्हा दाखल आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवसा घरफोडी होणाऱ्या गुन्ह्यांचे तपास करणेकरीता मा. डी. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व कुमारी नयोगी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सदर घरफोड्यांचा संमातर तपास करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वे शाखेची तपास पथके तयार करण्यात आली. सदर तपास

पथकांना मागिल घरफोडी चोरीचे अ-उघड गुन्हे तसेच वर नमूद दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. प्रविण कोल्हे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग च्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अविरत तपास व चौकशी करुन, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे दिवसा घरफोडी चोरी करणारा संशयीत आरोपी निष्पन्न केला. सदर आरोपीस सापळा रचुन शिताफीने शिरोळ, जिल्हा-कोल्हापुर येथुन ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसून तपास केला असता, त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण 17 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असलेचे उघड झालेले आहेत. सदर दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत भोसले, स्था.गु.अ.शाखा हे करीत आहेत.

संपूर्ण तपासकामात आरोपी संतोष रामाप्पा नंजन्नाचर, रा. शिरोळ, जि. कोल्हापुर, मुळ रा. नेरली, ता. हुक्केरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक वाने केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 17 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 53,51,150/-(प्रेपन्न लाख एकावन्न हजार एकशे पन्नास) रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन त्याचेकडे अधिक चौकशी चालु असुन आणखो घरफोडी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. नमुद आरोपीत यास कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं 302/2025 या गुन्ह्यात दि. रोजी अटक करण्यात आलेली असुन त्यास मा. दिवाणी न्यायालय, कणकवली यांचे न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास पाच दिवस पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. पुढील तपास चालू आहे.

सदरची कामगिरी डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुग

व कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत भोसले, श्री. सुधीर सावंत, श्री. अनिल हाडळ, पोलीस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सुरेश राठोड, डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, वस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जैक्सन घोन्साल्वीस, महेश्वर समजिस्कर, अमर कांडर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार धनश्री परब व युवराज भंडारी यांनी केलेली असुन त्यांच्या चांगल्या कामगीरीबाबत पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page