कुडाळ प्रतिनिधी
नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव 25 देव दिपाली निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी कौल डोंगर जत्रौत्सव साजरा करण्यात आला या जत्रौत्सवाच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती.या निमित्ताने आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रासादिक भजन मंडळ पोखरण बुवा श्री समीर कदम तसेच विरुद्ध गुरुदत्त प्रसादिक भजन मंडळ मुंबई बांद्रा तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी बुवा श्री.गणेश जांभळे या दोन बुवांमध्ये आमने- सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी उपस्थित बुवा व मान्यवर यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.निलेश गुरव यांनी उत्कृष्ट रित्या केले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री.रुपेश पावसकर, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष तथा कलेश्वर देवस्थान उपसमिती अध्यक्ष श्री. चारुदत्त देसाई, नेरुर गावच्या सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर, नेरूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.संतोष चव्हाण ,नेरूर गावचे पोलीस पाटील श्री.गणपत मेस्त्री, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख श्री.निलेश मेस्त्री,माजी सरपंच श्री.शेखर गावडे, माजी सरपंच श्री.प्रसाद पोइपकर,चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक श्री.देवेंद्र नाईक,शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विनायक राणे,श्री.गणपत मेस्त्री,श्री.सुहास नेरुरकर,श्री.सुधाकर नेरुरकर,श्री.नितीन नेरुरकर,श्री.अरविंद नेरुरकर,श्री.विजय नेरुरकर,श्री.विलास मेस्त्री,श्री.संतोष धामापूरकर,श्री.बाळा मेस्त्री, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरूर कौल डोंगर जत्रौत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
