भव्य रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद..!
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे समर्थन दर्शवले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना आडिवरेकर व रांगणेकर यांनी आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली. सावंतवाडी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहोत. शहरात नवे बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तेव्हा, या बदलांचे साक्षीदार होण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी आम्हाला पालिकेच्या सभागृहात पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
