मालवण प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले काम या जीवावर आम्ही नगरपालिका निवडणुकीसाठी मते मागत असून येथील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व वीसही उमेदवार निवडून येतील. विकास हा केंद्र बिंदू ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवत असून पालिकेत आपली सत्ता आल्यावर शहरातील नागरिकांना आपण काय देणार आहोत, त्याचा परिपूर्ण आराखडा घेऊनच आम्ही जनतेकडे मते मागणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील शिवसेनेचे प्रभाग ८ चे उमेदवार राजन परुळेकर व शर्वरी पाटकर यांच्या गवंडीवाडा येथील प्रचार कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी केले.
मालवण नगरपालिका प्रभाव ८ मधील शिवसेना प्रचार कार्यालयाचे आ.निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
