जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत:सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे
कुडाळ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या ६ जून आणि या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गडावर मिळून ३५० पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
*सध्याची पर्यावरणाची होत असलेली हानी,वृक्षतोड आणि त्यामुळे वाढत चाललेली उष्णता,होत असलेला निसर्गाचा कोप अशा परिस्थितीत अखिल भारतीय मराठा मराठा महासंघाकडून पर्यावरण पूरक उपक्रम घेण्यात येणार आहे.आणि त्यासाठी शिवराज्याभिषेक सप्ताह राबविण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून प्रथम उद्या ६ जून २०२४ रोजी रांगणा गडावर आणि पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या पर्यावरण पुरक उपक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी केले आहे.
उद्या सकाळी ७:३० वाजता रांगणा गडाच्या पायथ्याशी वृक्षारोपणास सुरुवात होईल तरी समाजबांधवांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे ही विनंति*
यासाठी संपर्क-9890002684,9404920440