खाण व क्रेशर मालकांवर कारवाईसाठी संबंधित विभागाचा दुर्लक्ष…

सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचे १५ जून रोजी आत्मक्लेश आंदोलन..

सावंतवाडी (प्रतिनिधी)
वेत्ये, इन्सुली येथे असलेल्या क्रशर व खाणीवर नियंत्रण नसल्यामुळे वनखाते, रेव्हून्यूखाते, जी एस टी खाते वन खाते,,आयकर खाते,एम सी बी खाते, यांना त्यांचे कर्तव्याची जाणिव व्हावी यासाठी पंधरा जून २०२४ रोजी तुळसान पुलाजवळ पोलीस चौकी शेजारी एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे.
पर्यावरण संरक्षण,राखीव वने संरक्षण ,मनुष्य, प्राणी, , पशु पक्षी यांचे संवर्धन व्हावे, सरकारी उत्पनाची चोरी होऊ नयेः यासाठी दि. १५/०६/२०२४ रोजी तुळसान पूला जवळील पोलीस चौकी शेजारी हे आत्मक्केशाचे सकाळी १०.०० ६.०० वा. पर्यंत चे १ दिवसाचे उपोषण करावे लागत आहे,
या पूर्वी अनेक तपशिल‌वार कळवूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करने यावर त्वरीत उपाययोजना न झाल्याने निगुडे गाव पूर्वी प्रमाणे घोक्यात, आले आहे. गेल्यावर्षी २५० घरांना ३०००,०००/ नुकसानू। दिले म्हणजे उपाययोजना होत नाही व्र त्याप्रमाणे सुरक्षीत पणे क्रशर /खाण मालक वर्तन करत नसतीलः पर्यावरण संरक्षण हा विष्य त्यांना गौण वाटत असेल तर त्यांना सनदशीर मार्गाने वठवणीवर आणण्यासाठी हा आत्मक्लेशचा मार्ग अवलंबवा लागत आहे.
जर उचीत वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास याला जबाबदार असलेल्या संपूर्ण यंत्रणेला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्या साठी न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page