अकरावी प्रवेशासाठी वरिष्ठांचे आदेशच नाहीत – शिक्षण विभाग.
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्गच्या शालेय शिक्षण विभागाला ११ वी प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा विसर पडला असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केला आहे.
ऍड सुहास सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हट्ले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा मध्ये मराठा आरक्षणणाची अंमलबजावणी होत नाही, असे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिलेले नसल्याने अंमलबजावणी होणार नसल्याचे सांगितले. सायंकाळपर्यंत आदेश आल्यास कळऊ असे उत्तर दिले. त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी आपल्या नजिकच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन मुख्याध्यापक यांना मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी असा आग्रह धरावा, असे आवाहन ऍड. सुहास सावंत यांनी केले